Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane For Female – Hello Friends, If You Looking Best Marathi Ukhane For Female With Images To Sharing With Your Whatsapp Status And Facebook Story. Below We Added 200+ Modern Marathi Ukhane For female With Marathi Ukhane Images For Girls. So Keep Sharing This Post With Your Best Friend On Her Wedding Day On Whatsapp DP. Marathi Ukhane For Female Funny With Romantic Long Marathi Ukhane For Girl. Best Beautiful Latest New Female Marathi Ukahen Are Perfect For Sharing On Marriage & Wedding Ceremony.

Peoples Also Download Latest Marathi Ukhane for Female Satyanarayan Pooja, Dohale Jevan Ukhane Marathi, Marathi Ukhane For Naav Ghene, Marathi Ukhane For Pooja, Comedy Ukhane In Marathi, Marathi Ukhane For Female Griha Pravesh. Keep Sharing Marathi Ukhane For Engagement, Wedding, Marathi Ukhane For Bride. Unique Marathi Ukhane, Love Marathi Ukhane For Female.

Marathi Ukhane For Female

Latest Marathi Ukhane For Girls
Latest Marathi Ukhane For Girls
 1. माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने….राव आहेत सोबत,  मग मला कशाचे उणे

 2. उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

 3. मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर,….रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

 4. सुख-दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले……. रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले.

 5. तिळगुळाच्या संक्रांतीला, जमतो स्वादिष्ट मेळ…रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ

 6. मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,…. रावांचे नाव घेते …. ची मी सून

 7. सर्वांना नमस्कारा साठी जोडते हो हात,….रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

 8. अलंकार अलंकार मंगळसूत्र मुख्य,
  …………रावांचा आनंद हेच माझे सौख्य.
 9. रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा

 10. आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

 11. लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू,….रावांना घास देताना,मला येई गोड हसू .

 12. आकाशाच्या पोटी चंद्र सूर्य तारांगणे,……….. रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे.

 13. सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,…रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ

 14. नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,…. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी

 15. शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,….राव माझे जीवनसाथी.

 16. नवीन निघाली कादंबरी वाचन करते पूरी,…….रावांचे नाव घेते……..च्या घरी.

 17. उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वावआज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव

 18. सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

 19. अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,….रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा.

 20. आईचे वळण, वडिलांचे शिक्षण,……… राव पती मिळाले हेच माझे भूषण,

Marriage Marathi Ukhane For Bride

Best Marathi Ukhane For Bride
Best Marathi Ukhane For Bride
 1. संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला…रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला

 2. हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

 3. चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,….रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.

 4. क्षणाची विद्युलता ब्रह्मांड उजळी,……….. चं नाव घेते …….. च्या वेळी.

 5. तीळगुळाच्या देवघेवीने, दृढ जुळते नातं….रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांत

 6. सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

 7. आकाशाच्या अंगणात ,ब्रह्मा ,विष्णू आणि महेश,….रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश .

 8. पावसाच्या पहिल्या सरीने भिजते चातकाची काया,………… च्या साठी सोडले आई-वडिलाचे घर, तरी सुटत नाही माया.

 9. सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात….रावांचे नाव घेते, ….च्या घरात

 10. गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती

 11. गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,….चे नाव माझ्या ओठी यावे.

 12. वसंत ऋतूत कोकिळा करते गुंजन,…….. रावण सह करते…….पूजन,

 13. आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा….रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा

 14. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

 15. केळीच्या पानावर गाईचं तूप,….रावांचं कृष्णासारखं रुप.

 16. गाथा, पोथी वाचते, गाते मी अभंग,……… रावांच्या संसारात आहे मी दंग.

 17. उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वावआज आहे संक्रांती, मी घेते…..रावांचे नाव

 18. माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी

 19. केळी देते सोलून पेरू देते चोरून,….रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून.

 20. चंदनाच्या झाडाखाली हरिणी घेते विसावा,……. रावांचे नाव घेते आशिर्वाद असावा.

Modern Marathi Ukhane For Female

Romantic Marathi Ukhane For Female
Romantic Marathi Ukhane For Female
 1. संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी….रावांमुळे आली , माझ्या आयुष्यात गोडी

 2. लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,आणि …. रावांच्या घशात अडकला घास

 3. डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,….रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

 4. वसंत ऋतुच्या आगमनाने शितल होते धरणीची काया……..रावांचे नाव घेऊन पडते…… च्या पाया.

 5. मोत्याची माळ,  सोन्याचा साज….रावांचे नाव घेते, मकर संक्रांंतीचा सण आहे आज

 6. लग्नात लागतात हार आणि तुरे,…. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

 7. आनंदाने भरला दिन हा लग्नाचा,….ल घास देते,गोड जिलेबीचा.

 8. लोकनाट्यातील प्रकार आहे सवाल-जवाब,……… रावांचा आहे……. तालुक्यात मोठा रुबाब.

 9. गोऱ्या गोऱ्या हातावर, रेखाटली मेंदी….रावांचे नाव घेण्याची, नेहमी मिळो संधी

 10. बारिक मणी घरभर पसरले,….. रावांसाठी माहेर विसरले

 11. चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला,….रावांच नाव घ्यायला आजच प्रारंभ केला.

 12. चंदनासारखे झिजावे, उदबत्तसारखे जळावे,……….. रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे.

 13. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात….रावांचे नाव ऐकायला बसले सगळे प्रकाशात

 14. चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

 15. मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला,….रावांचे आयुष्य वाढो हीच प्रथना तुला.

 16. हिमालय पर्वतावर योगी बसले ध्यानाला,…….रावांचे नाव घ्यायला मानपान कशाला.

 17. पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे…रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे

 18. एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती

 19. संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,….रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

 20. सासराला जाताना सोडावे लागे माहेर,…….राव जीवनात मला प्रीतीचा आहेर.

Best Marathi Ukhane For Girls

Funny Marathi Ukhane For Female
Funny Marathi Ukhane For Female
 1. दोन जीवांचे मीलन जणू, शतजन्माच्या गाठी…रावांचे नाव घेते , तुम्हा सर्वांसाठी!

 2. सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

 3. साजूक तुपात नाजूक चमचा,….रावांचं नाव घेते आशीर्वाद असावा तुमचा.

 4. महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडले,…….. च्य जीवासाठी आई-वडिल सोडले.

 5. तेल लावून,  कंबर माझी मोडली,पाडव्याची ओवाळणी पाहता, कळी माझी खुलली

 6. गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले

 7. गुलाबाचे फुल दिसायला ताजे,….रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

 8. उभी होते तळ्यात, नगर गेली मळ्यात,…….हजाराची कंठी,…………. रावांच्या गळ्यात.

 9. सासरची छाया,  माहरेची माया,….राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया

 10. पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,….. रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

 11. कुरुंदाची सहन चंदनाचे खोड,….रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.

 12. नागपूरची संत्री, जळगावची केळी,………… रावांचं व माझे ‘शुभमंगल’ झालं गोरज मुहूर्ताच्या वेळी.

 13. गुढी पाडव्याच्या सणाला, कडूलिंबाचे पान…रावांचे रूप पाहून, झाले मी बेभान

 14. मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

 15. नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,….रावां सोबत आली मी सासरी.

 16. गंगेचे क्षेत्र श्री विश्वेश्वर काशी,……..रावांच नाव घेते ……..दिवशी,

 17. मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर…रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर

 18. सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

 19. दान दागीण्यापेक्षा शब्द हवा गोड,….रावांच्या संसाराला.…ची जोड.

 20. आईच्या प्रेमाची सर नाही कुणाला,…….चे नाव घेते सांगाल त्या वेळेला.

Marathi Ukhane For Female Funny

Funny Marathi Ukhane For Female
Funny Marathi Ukhane For Female
 1. बहिणासारख्या नणंदा, भावासारखे दीर…रावांचे नाव घ्यायला, पाडव्याला झाले मन अधीर

 2. मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,….. रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल

 3. सोन्याचे मंगळ्सूत्र सोनाराने घडविले,….रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी मला अडविले.

 4. सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता-पिता,…….. चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

 5. हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,…रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी

 6. ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,…..रावांचे नाव घेते …..च्या दिवशी

 7. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,….चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

 8. जगाचे अंगण, मनाचे वृंदावन,………. रावांचे नाव हेच माझे भूषण.

 9. माहेरची माया आणि माहेरची साडी…रावांची आणि माझी पाडव्याच्या दिवशी जमली जोडी

 10. मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम,….. रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम

 11. ….ची लेक,झाले….यांची सुन,….चे नाव घेते गृहप्रवेश करून.

 12. सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान,……… चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

 13. पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी…रावांमुळे आली, आयुष्याला गोडी

 14. सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी

 15. चांदीच्या ताटात अगरबतीचा पुडा,….च्या नावाने भरला हिरवा चूडा.

 16. वर्तन असावे साधे, वाणी असावी गोड,
  ……… रावांच्या जीवनाला माझी जोड.
 17. नववर्षाच्या शुभारंभासाठी येतो पाडवा…रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा

 18. रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास

 19. अबोलिच्या फुलाचा गंध काही कळेना,….चे नाव घेण्यास शब्द काही जुळेना.

 20. हिन्याला कोंदण सोन्याचे, प्रेमाला कोंदण नात्याचे,……. नाव घेते सर्वांच्या आग्रहाचे.

Romantic Marathi Ukhane For Female

 1. चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,…रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा

 2. तेलाच्या दिव्याला तुपाची वात,——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

 3. चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप,….रावांच समवेत ओलांडते माप.

 4. गुलाब असतो काटेरी, मागेरा असतो सुगंधी,……….. रावांच्या जीवनात मी आहे आनंदी.

 5. घातली मी वरमाला, …रावांच्या गळीपाडव्याच्या दिवशी येते गालावर लाली

 6. हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत—— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

 7. सावित्रीने नवस केला, पती मिळावा सत्यवान,….रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

 8. देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,……. नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.

 9. सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,…रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण

 10. एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,—— रावांची सारी माणसे मी आपली मानली

 11. जशी आकाशात चंद्राची कोर,….हे पती मिळायला माझे नशीब थोर.

 12. रोहिणीला साथ चंद्राची, सागराला साथ सरितेची,
  अखंड लाभो साथ मला……….. रावांची.
 13. जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनीपाडव्याच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

 14. सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,—— रावांचे नाव घेते —— ची सून

 15. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,….रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.

 16. मनोभावे पूजा केली, लुटले सौभाग्याचे वाण,…….. साठी मागितले दीर्घायुष्याचे दान,

 17. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं…रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं

 18. काढ्यात काढा पाटणकर काढा,—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

 19. अत्तराचा सूगंध दरवळला चहुकडे,….रावांच्या नामाचा लौकिक होउ दे सगळिकडे.

 20. आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास,……..नाव घेते तुमच्यासाठी खास.

Comedy Marathi Ukhane For Female

 1. नंदवनात असतात सोन्याची केळी….रावांचे नाव घेते पाडव्याच्या सणाच्या वेळी

 2. अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना

 3. शंकराचा सोमवार, गणपतीची चतुर्थी,माझ्या ह्रुदयांत कोरली,….रावांची सुंदर मूर्ती.

 4. मनासारखा मिळाला जोडीदार, कृपा देवाची मानते,
  …………चे पत्नी पद अभिमानाचे मिरवते.
 5. शेल्याशेल्याची बांधली गाठ…रावांचे नाव मला अगदी तोंडपाठ

 6. सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

 7. मंगल दिनी, सोनेरी क्षणी हार घालते एकामेका,….रावांच्या सौभाग्याने नाव घेते ऐंका.

 8. नेत्रदीप निरंजन दिसे तेजोमय,……….च्या सहवासात जीवन झाले सुखमय.

 9. सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही…रावांचे नाव पाडव्याच्या दिवशी ओठावर येई

 10. देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश—– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश

 11. हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी,….रावांच नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी.

 12. शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,……….. सारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता.

 13. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून…रावांचं नाव घेते….ची सून

 14. अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,काल होते मी युवती, आज झाले ——- रावांची सौभाग्यवती

 15. हळद घेतली,कूंकु घेतलं,घेतली निरंजन आणी काडेपेटी,….रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा पोटी.

 16. कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मी च्या गळ्यात,
  ………चं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात.
 17. जन्म दिला मातेने, पालन केले पित्यानेमंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

 18. झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,—– राव सुखी रावो हीच आस मनाची

 19. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकुन,….रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.

 20. रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला,
  ………..चं नाव घेते ……..सणाला.

Marathi Ukhane For Female Marriage

 1. लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी…रावांचे नाव घेते, पाडवा सणासाठी!

 2. सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,—— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात

 3. लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,….रावां सारखे पती मिळाले, भाग्य माझे किती.

 4. निलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात,………. ची पत्नी होऊन धन्य झाले जगात.

 5. चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,…रावांचे नाव घेते देवापुढे

 6. जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,—— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद

 7. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,….रावांच नांव घेते,….दिवशी.

 8. सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ,……….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.

 9. संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा…रावांचे नाव घेऊन,  आशिर्वाद मागते सौभाग्याचा

 10. शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,—— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

 11. लग्नात लागतात हार आणि तुरे,….च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

 12. निलावर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी,……….. चं नाव घेते ………. च्या घरी.

 13. सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी…रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी

 14. सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,—— रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

 15. निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान,…………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

 16. जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले…रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले

 17. प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,—— रावांचे नाव घेऊन सोडले काकण

 18. आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा,
  ………… चा व माझा संसार आहे सुखाचा.
  भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी,
  ……….चं नाव घेते ………. दिवशी
 19. बारीक मणी घरभर पसरले…रावांसाठी मी माहेर विसरले

 20. आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,——रावांना भरविते जिलेबिचा घास

Marathi Ukhane Image For Female

 1. भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता,………… नाव घेते सर्वांच्याकरिता.

 2. सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,…रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट

 3. मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,—— रावांनी दिला सौभाग्याचा आहेर

 4. संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,………च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.

 5. गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी….रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी

 6. इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,—— रावांचे नाव घेते—— ची मी सुन

 7. संसाररुपी मार्गावर दोन प्रवासी नवे,………… हेच पती सात जन्मी हवे.

 8. सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वासमंगळगौरीच्या दिवशी देते….रावांना जिलबीचा घास

 9. लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,——रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात

 10. सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं,जीवन नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.

 11. कपाळाचं कुंकू, जसा चांदण्याचा ठसा…रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा

 12. मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,——रावांचा संसार हा सुखाचा कळस

 13. दह्याचे करतात श्रीखंड, दूधाचा खवा,……..चं नाव घेते नीट लक्षात ठेवा.

 14. सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह….रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह

 15. आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,—— रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल

 16. सतारीचा नाद, वीणा झंकार,……….. च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार.

 17. महिन्यात असते कधी पुनव कधी अवस….रावांचे नाव  घेते, आज मकर संक्रांतीचा दिवस

 18. मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,——राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी

 19. प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनाची, त्यागजाणावा राम सीतेचा,…….नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.

 20. मंगळागौरी माते, नमन करते तुला….रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला

Marathi Ukhane Quotes For Female

 1. मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून,—- राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून

 2. तिरंगी झेंड्याला वंदन करतात वाकून,……..रावांचं नाव घेते तुमचा मान राखून

 3. हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी….रावांचं नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी

 4. ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,….. राव आणि माझी जोडी ठेव सुखात

 5. दारातील तुळशीला पाणी घालते गार,…….. रावांच्या नावाला रात्र झाली फार.

 6. गजाननाची कृपा, गुरूंचा आशिर्वाद…रावांचे नाव घ्यायला मंगळागौरीच्या दिवशी करते सुरुवात

 7. वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,….. रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा

 8. दारातील तुळशीला पाणी घालते गार,…….रावांच्या नावाला आग्रह नको फार.

 9. संसाराच्या सागरात प्रीतीच्या लाटा….रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा

 10. शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले,….. रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले

 11. आई-वडिल, भाऊ-बहीण यांच्या सहवासात वाढले,
  ……….मुले मला सौभाग्य चढले.
 12. नाव घ्या नाव,  सगळे झाले गोळा,….रावांचं नाव आहे, एक लाख रूपये तोळा

 13. विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,….. रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष

 14. काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,….. रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद

 15. बागेमध्ये असतात, गुलाबाच्या कळ्या…रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या

 16. जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,….. रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा

 17. आकाश आले भरुन, चंद्र लपला ढगात,………… ना हार अर्पण करून धन्य झाले जगात.

 18. रेशमाचा सदरा, त्याला प्लास्टिकचे बक्कलआमचे…राव आहेत हँडसम, पण डोक्यावर मात्र टक्कल

 19. गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी

 20. विहिरी भरल्या काठोकाठ नदीला आला पूर,………… च्या साठी आई-वडिल केले दूर.

So We Hope You Like This Marathi Ukhane For Female With Images Post And You Also Share it With You Best Friend, Family, Sister On Whatsapp Status & Instagram. Heart Touching Marathi Ukhane For Female Are Best To Celebrating Wedding.